मासोळी आणि चिमुकलं पाखरू

एका अवखळ मासोळीची ही कथा फारच मजेशीर आहे. तळ्याकाठी दिसणाऱ्या पाखराला मासोळी आपल्या सवंगड्यांबरोबर खेळायला पाण्यात बोलावते. आता पाखरू पाण्यात कसं येणार? पाखरू तर झाडावर राहतं, आकाशात घिरक्या घेतं. मासोळीची उत्सुकता वाढते, तिला वाटते मलाही छोटेसे पंख आहेत, छोटीशी शेपूट आहे. मी पण उडायला शिकणार, झाडे फुले पक्षी फुलपाखरे सगळं सगळं पाहणार. आई बाबानी समजावूनही मासोळी ऐकत नाही आणि पाण्याबाहेर झेप घेते तेव्हा कुठे तिला जाणीव होते की पाण्याबाहेरचं जग वेगळं आहे, आपण तिथे नाही राहू शकत. आईही समजावते, आपलं पाण्यातलं जग किती सुंदर आहे…पण पाखरांना पाहता येतं का ते ?

मासोळी आणि पाखरू आपापल्या जगातील सुंदर गोष्टी सांगत एकमेकांचे जिवलग मित्र बनतात.

गोष्टीबरोबर तळ्यातल्या मासोळीची, दगडावर बसलेल्या, आकाशात उडणाऱ्या पाखराची रंगीत चित्रे या पुस्तकात आहेत. मेधा सुदुंबरेकर यांनी रेखाटलेली collage शैलीतील ही चित्रे अगदी निरागस आहेत.

‘थंडी पळाली’ आणि ‘मधात पडली माशी’ या इतर दोन गोष्टी ह्या पुस्तकात आहेत. थंडी पळाली ही सुद्धा मला विशेष आवडलेली गोष्ट.

बबी नावाची मेंढी आपल्या अंगावरची लोकर अनेक गरजू दोस्तांना देते. दिवाळी संपते तशी थंडी सुरु होते आणि बबीला हुडहुडी भरते. बबी आपली लोकर मागायला परत जाते खरी पण कुणीच तिला तिची लोकर परत करू शकत नाही. तेवढ्यात एक धनगराचा पोर बबीला आपल्या घोंगडीत गुरफटून घेतो; बबीची थंडी पळते आणि दोघांची गट्टी जमते.

चिऊताई, काऊताई बरोबरच या गोष्टीत साळुंकी, बुलबुल, बाया, शिंपीण, दयाळ, कबुतर, चिचुंद्री, मुंगूस, खारुताई अशा आपल्या परिसरात दिसणाऱ्या, मुलांना प्रत्यक्ष दाखतवता येतील अशा पशु-पक्षांचा उल्लेख आहे हे मला फार आवडलं. नाहीतर गोष्टींमध्ये एकतर थेट वन्य प्राणी तरी असतात नाहीतर आपल्या प्रांतात कधीही न दिसणारे प्राणी असतात.

लेखिकेने नमूद केल्याप्रमाणे अगदी छोट्या मुलांनी पाहत पाहत ऐकाव्या आणि वाचता येणाऱ्यांनी वाचत वाचत पाहाव्यात अशा या बाळगोष्टी आहेत.

The fish and the little bird या नावाने या पुस्तकाचा इंग्रजी अनुवादही उपलब्ध आहे.

लयदार वाक्यांमुळे माधुरी पुरंदरे यांच्या गोष्टी वाचून दाखवायला खुपच मजा येते. उदाहरणार्थ :

बबी चांगली अबदुल गबदुल होती.

उन्हं मऊ मऊ झाली.

त्यांच्याबरोबर ती पाण्यात दिवसभर हुंदडायची, सुळकन इकडे आणि सुळकन तिकडे धावायची.

मासोळीची आई सुर्र सुर्र पोहत आली.

माधुरी पुरंदरे या जागतिक ख्यातीच्या कलाकार आणि लेखिका आहेत. बालसाहित्यातल्या योगदानासाठी त्यांना २०१४ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहेत. ओघवती, सरळ पण संपन्न भाषा व नाविन्यपूर्ण गोष्टी यामुळे मला माधुरी पुरंदरे यांची सगळीच पुस्तके फार आवडतात. त्यांच्या इतर पुस्तकांविषयी मी पुढील भागांमध्ये लिहीणारच आहे.

पुस्तक कुठे मिळेल:

  1. मासोळी आणि चिमुकलं पाखरू, bookganaga.com वर 
  2.  मासोळी आणि चिमुकलं पाखरू, akshardhara.com वर
  3. The fish and the little bird on akshardhara.com

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s